शिरूर तालुका

कान्हूर मेसाई-मिडगुलवाडीचा रस्ता उखडला अवघ्या दोन महिन्यातच…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): कान्हूर मेसाई येथे डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ तीनच महिने झालेले असताना कान्हूर ते मिडगुलवाडी दरम्यान जागोजागी उखडला आहे. रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकांसह नोकरदारांची झालेली गैरसोय व रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नशिबी आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहे.

रस्त्याचे ज्या ठिकाणी काम झालेले आहे त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. कान्हूर ते मिडगुलवाडी या दरम्यान तीन महिन्यांपूर्वी जून महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करण्यात आले होते. अवघ्या तीनच महिन्यांत हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही. वळणावर असलेले बिनकठड्याचे पूलही अत्यंत धोकादायक आहेत.

पुलांना कठडेच नाहीत….
कान्हूर मेसाई-मिडगुलवाडी या रस्त्यावर व दोन ते तीन ठिकाणी जे पूल बांधण्यात आले आहेत. त्या पुलांना संरक्षक कठडेच करण्यात आलेले नाहीत. पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिक करत आहेत.

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

रांजणगाव गणपती मध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा अनेक बॉम्ब फोडणार संग्राम शेवाळे यांचा ‘वाल्या’ ला इशारा

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago