शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे जगतापवस्ती येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, इंगळे नगर या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने छोटे-मोठे हल्ले करून अनेक प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जेरबंद केले आहे. या घटना ताज्या असतानाच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीतील जगतापवस्ती येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री १०:३० च्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेच्या आधी बिबट्या रात्री ८ वाजता किरण रामदास ढमढेरे यांना दिसला होता त्यांनी सर्वांना सावध केले होते. त्यानंतर काही वेळाने बिबट्याने प्रमोद किशोर भुजबळ (रा. जगताप वस्ती,तळेगाव ढमढेरे) यांच्या पाळीव कुत्र्यावर घराच्या ओट्यावर येऊन हल्ला केला.ओट्यावर आवाज आल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली असता बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी मोठ्याने आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून गवतामधे पळ काढला. या घटनेत त्यांचा कुत्रा गंभीर जखमी झाला. या घटनेने वस्तीत राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत.

सदर घटनेच्या दुसऱ्या रात्री सुद्धा पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. मात्र, त्याला पकडण्यासाठी वनविभागाने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव महागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरूनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेंढपाळ व मेंढपाळांना त्यांची जनावरे चरायला नेणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्री पिकांना पाणी देणे अशक्य असल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शेतमजूर भीतीपोटी कामाला बाहेर पडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यासोबतच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वनविभाग गंभीर नसल्याने वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

11 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

11 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago