शिरुर महसुल विभागाची गौण खनिज उपसा करणाऱ्या ४ पोकलेन व १४ ट्रकवर कारवाई

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरुर) येथे अवैधरीत्या बऱ्याच दिवसापासून मुरुम उत्खनन करणाऱ्या चार पोकलेन व मुरुम वाहतुक करणाऱ्यासाठी येणाऱ्या तब्बल १४ हायवा ट्रक यांच्यावर शिरुर महसुल व शिरुर पोलिस यांनी संयुक्तरीत्या धाड टाकत काही ट्रक ताब्यात घेत शिरूर पोलिस स्टेशन येथे पुढील कार्यवाही करणाऱ्यासाठी नायब तहसिलदार स्नेहागिरी गोसावी यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये लेखी अर्जाद्वारे फिर्याद दिली आहे.

मुळातच करडे येथे हा अनाधिकृत मुरुम उपसा एवढा मोठया प्रमाणावर होत असताना तेथील तलाठी, मंडल आधिकारी काय करत होते. कोणाच्या आशिर्वादाने हा सगळा कारभार सुरु होता याची तपासणी होणे गरजेचे असून गौणखनिज माफियांबरोबरच या कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडल आधिकारी, बीट अंमलदार यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रकार थांबूच शकत नसल्याची चर्चा नागरीक करत आहे.

या कारवाई संदर्भात महसुल विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार महसुल विभागाने शिरुर पोलिसांशी चर्चा करुन संबंधित गौणखनिज कारवाईबाबत चर्चा करुन २ पथक तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार पथक क्र. १ मध्ये नायब तहसिलदार गिरीगोसावी समवेत. ई. एम. ढाके -मंडळ अधिकारी टाकळीहाजी, व्हि.डी. बेंडभर- तलाठी निमोणे, ए.टी. सुपे -तलाठी आमदाबाद, ए.डी. थिंगळे, तलाठी – पिंपरखेड, तसेच पथक क्र. २ मध्ये पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, जि. आर. घोडके – तलाठी सणसवाडी, ए. ए. कडेकर -तलाठी करंदी जि. जि. बिघोत- तलाठी निर्वा असे दोन पथके तयार करण्यात आली होती.

त्यानुसार पथक क्र. १ न्हावरे रोडने करडे हद्दीतील IFB कंपनी बाजुने खाजगी वाहनाने रवाना झाले तसेच पथक क्र. २ गोलेगाव रोडने दावल मलीक या हद्दीमधुन खाजगी वाहनाने रवाना झाले त्यानुसार पथक क्र. १ हे करडे गावचे हरीतील IFB कंपनीच्या पाण्याच्या टाकीच्या जवळील जागेत पथक गेले असता टाकीपासुन पुर्व बाजुस असणारे मौजे करडे गावचे गट नं. १६७, १६८/१, १६८/२, १६८/३, १६८/४ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी (आसपास) ४ पोकलेन मशिनव्दारे मुरुमाचे उत्खनन अनाधिकृतपणे करीत असलेचे दिसून आले.

मोठ्या क्षेत्रावर व मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक होत असलेने लगतच्या सरकारी गायरान गट नं. १६६ मधुनही उत्खनन झालेची शक्यता आहे. याबाबत शासकिय मोजणी करुन खातरजमा करण्यात येणार आहे. पथक सदर पोकलेन मशिनजवळ पोहचताच सदरचे पोकलेन मशिन चालक पथक जवळ येत असल्याचे पाहून पाण्याच्या टाकीच्या पूर्व दिशेस पोकलेन घेऊन अंधारचा फायदा घेऊन जवळच्या अंतरावर पोकलेन मशिन बंद करून व पोकलेन उभे करुन चालक पळून गेले.

तसेच सदर ठिकाणी असलेले काही हायवा ट्रक हे दावल मलिक मंदीर रोड गोलेगाव हद्दीच्या दिशेने कच्च्या रस्त्याने पळुन जातांना पथकाला दिसुन आले. त्यानुसार पथक क्र. २ मधील तलाठी सणसवाडी यांना सदरचे हायवा ट्रक हे दावल मलिक मंदीर गोलेगावच्या दिशेने येत असलेचे कळविले.

दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक हे घटानास्थळी हजर झाले व पथक क्र. १ सोबत त्यांनी पाहणी केली असता त्यांना अनाधिकृत उत्खननाच्या ठिकाणी बंद अवस्थेत असलेले ४ पोकलेन व १ ट्रक आढळुन आले. व ते ताब्यात घेतले त्याची चासी क्रमांकाची माहिती खालील प्रमाणे पोकलेन मशिन ( १) ह्युंडाई कंपनी मॉडेल क्रमांक EX-२१० LC मशिन सिरीअल क्रमांक SP २१ ४६३४२४ (२) ह्युंडाई कंपनी मॉडेल क्रमांक EX-२१०-LC-super मशीन सिरीअल क्रमांक S- २००-२३२५५ (३) टाटा हिताची कंपनी मॉडेल कंपनी EX-२१०- LC super मशीन सिरीअल क्रमांक २९०-४०६०५ (४) ह्युंदाई कंपनी मॉडेल क्रमांक R-२१०-LC-७ मशीन सिरीअल क्रमांक NGOD००८८९ व सदर ठिकाणी ट्रक क्रमांक MH१२ EQ०५८२ हा बंद अवस्थेत उभा असल्याचे दिसुन आले परंतु सदर ४ पोकलेन मशीन व ट्रक यांचे इंजिन हे गरम असल्याचे दिसुन आले.

सदरचे पोकलेन मशीन व ट्रक हे बंद अवस्थेत असल्याने व सदरचे मशीन चालक पळून गेले असल्याने व पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने सदरचे वाहने जप्त करुन तहसिल कार्यालयात जमा करता आले नाही. सदरच्या पोकलेन मशिनव्दारे उपरोक्त जमीन गट नंबर मध्ये अंदाजे ५०० ब्रास उत्खनन झाले असल्याचे दिसुन येते.

दरम्यानच्या काळात स्नेहा गिरीगोसावी यांनी तलाठी सणसवाडी यांना फोन करुन कळविले की करडे MIDC च्या गोलेगाव हद्दीतील दावल मलीक मंदिराशेजारी कच्च्या रत्याने येणारे एकुण १४ हायवा ट्रक एका पाठोपाठ या प्रमाणे पोलीस उपनिरिक्षक विक्रम जाधव व पोलीस कर्मचारी व महसुल पथक क्र. २ या पथकाने ताब्यात घेतल्याचे व सदर वाहनाबाबत योग्य ती कारवाई होणेकामी व मदतीसाठी येणेकामी कळविले त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक शिरुर व पथक क्र. ९ हे दावल मलीक मंदीर गोलेगाव हद्दीमध्ये कच्च्या रस्त्यावर १४ हायवा ट्रक पोलीस व महसुल पथक क्र. २ ने ताब्यात घेतले होते.

सदरचे हायवा क्रमांक खालील प्रमाणे

(1) MH 16CD 0104 (2) MH 17 BY 9264 (3) MH 12 SF 0055 (4) MH 16 BC 6116 (5) MH 12 RN2277 (6) MH 16 CD 0105 (7) MH 42 AQ 3847 (8) MH 12 KP 8177 (9) MH 23 AU 1721 (10) MH 12 QJ 9378 (11) MH 12 KP 8176 (12) MH 13 CU 5090 (13) MH 12 QW 8259 (14) नंबर नसलेला पंरतु सिरीअल नं. ०४७-०९०-२० vendor code ७२०१३२९९ हि असल्याचे दिसुन आले.

सदर हायवा ट्रकची पाहणी केली असता सदरच्या हायवा मध्ये मधुन मुरुम वाहतुक केल्याचे खानाखुना ताज्या स्वरुपाच्या दिसुन आल्या. हि वाहने शिरुर तहसिल कार्यालयात पुढील कारवाई करणेकामी घेऊन जात असतांना सदर चौदा हायवा पैकी (1) MH 16CD 0104 (2) MH 12RN 2277 (3) MH 16 CD 0105 (4) MH42AQ3847 (5) MH12KP8177 (6) MH12QJ 9378 (7) MH 12 KP 8176 (8) MH 13 CUS090 हि आठ वाहने हायवा ट्रक अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले सदरचे वाहन चालक यांनी पळवून नेले व उर्वरीत हायवा क्रमांक (1) MH 17 BY 92654 (2) MH 12 SF0055 (3) MH 16BC 6116 (4). MH 23 AU 1721 (5 ( MH 12 QW 8259 नंबर नसलेला हायवा सिरीअल नं. ०४७-०१०-२० vendor code ७२०९३२९९ हि वाहने तहसिल कार्यालयाच्या आवारात पुढील कारवाईसाठी जमा केली.

या सर्व पोकलेन मशिन तसेच हायवा ट्रक चालक व मालक तसेच वरील नमुद गट नंबरचे मालक व लिज धारक यांच्या विरुध्द नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.