शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील महसूल विभागात तलाठी आणि मंडल अधिकारी यांचे वेगवेगळे किस्से समोर येत असून, न्हावरे येथील एका मंडल अधिकाऱ्याने 9 मार्च 2026 रोजी सुनावणीची तारीख असताना तक्रारदाराने ज्या फेरफारसाठी अर्ज दिला होता. तो फेरफार 6 मार्च 2026 रोजी चुकीच्या पद्धतीने नोंदविला असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. याबाबत पूर्वा बाळासाहेब खळदकर हिने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे संबंधित मंडल अधिकाऱ्याच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे.
View this post on Instagram
याबाबत पूर्वा खळदकर यांचे मामा गणेश टेमगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वा हि अज्ञान पालक असून आंबळे (ता. शिरुर) येथील गट क्रं 176/1 (फेरफार क्रं 6844) मधील नोंद थांबविण्यासाठी तिने तलाठी यांच्याकडे 16 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज दिला होता. त्या अर्जाबाबत न्हावरे येथील मंडल अधिकारी प्रशांत कांबळे यांच्याकडे सुनावणीची तारीख 9 मार्च 2026 होती. परंतु तीन दिवस आधीच म्हणजे 6 मार्च 2026 रोजी प्रशांत कांबळे यांनी सुनावणी न घेताच फेरफार क्रं 6844 ची नोंद केल्याचे गणेश टेमगिरे यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर टेमगिरे यांनी सुनावणीच्या दिवशी दि 9 मार्च रोजी याबाबत मंडल अधिकारी कांबळे यांना याबाबत जाब विचारला. परंतु, कांबळे यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे टेमगिरे यांनी शिरुरच्या तहसीलदारांच्या कानावर हा घडलेला सगळा प्रकार घातला. तसेच मंडल अधिकारी यांच्या विरोधात लेखी तक्रारही केली.
टेमगिरे यांचे मंडल अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप…
गणेश टेमगिरे यांनी मंडल अधिकारी प्रशांत कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. शिरुर-न्हावरे, तसेच न्हावरे-तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सध्या रस्ता रुंदीकरणाची कामे चालू आहेत. तिथं जमीन खरेदी विक्री करणारी एक टोळी असुन मंडल अधिकारी कांबळे यांचा त्या टोळीला वरदहस्त आहे. हे लोक या परिसरात लोकांना जमीन विकायला परावृत्त करतात. अन्यथा तलाठी आणि मंडल अधिकारी यांना हाताशी धरुन त्यांचा रस्ता अडविणे, नोंदी तसेच फेरफार अडविणे अशा प्रकारे त्यांना त्रास देऊन जमीन विकण्यास भाग पाडत असल्याचे टेमगिरे यांनी सांगितले.
मंडल अधिकारी प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘टेमगिरे यांच्या सुनावनीचे दोन अर्ज होते. एका अर्जावर स्वतः टेमगिरे हजर होते. त्याची सुनावणी झाली. दुसऱ्या तारीख हि टेमगिरे यांच्या भाचीची होती. परंतु तिची परीक्षा चालू असल्यामुळे मी 9 मार्च हि सुनावणीची तारीख टेमगिरे यांना विचारुनच निश्चित केली. यामध्ये दोन फेरफार झाले असुन त्यातील एकाचा निकाल झाला आहे. दुसऱ्या सुनावणीचा निकाल बाकी आहे. टेमगिरे यांना निकाल मान्य नसेल तर त्यांनी याबाबत प्रांताकडे अपील करावे.’
(क्रमश:)
Video: शिरूर तालुक्यात गोठ्याला मध्यरात्री भीषण आग; बैलगाडा शर्यतीतील दोन बैल होरपळले…
सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शिरूर–मलठण रस्त्याची लागली वाट
पुणे ते शिरूर सहापदरी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरूवात…
शिरूर! ‘सुलभ’ भिशी घोटाळा प्रकरणात संशयाचे सावट झाले गडद…
शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?