शिरूर तालुका

खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!

रांजणगाव गणपती: खंडाळे (ता. शिरूर) येथे श्री शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न झाला. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे / रांजणगाव गणपती यांच्या पालखी सोहळ्यास संत एकनाथ महाराज संस्थांन पैठण च्या वतीने पैठणचे मानाचे फडकरी म्हणून घोषणा करण्यात आली.

खंडाळे येथे आज (शनिवार) सकाळी 9 ते 11 यावेळी मध्ये पालखी सोहळा सांगता समारंभ प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज ह भ प श्री योगेश महाराज गोसावी पैठणकर (पालखीवाले) यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी खंडाळे, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, वाघाळे, हिवरे कुंभार पंचक्रोशी आणि शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, दौंड, हवेली, जुन्नर ,आंबेगाव, खेड या तालुक्यांमधील भाविक-वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र खंडाळे/रांजणगाव गणपती येथून दरवर्षी श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी (नाथषष्ठी वारी) शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा या नावाने ह भ प संतोष महाराज खेडकर यांच्या नेतृत्वाखाली १३ दिवस पायी वारी दिंडी सोहळा जात असतो. पालखी सोहळ्या सोबत शेकडो वारकरी पायी जातात. संत एकनाथ महाराज यांच्याकडे जाणारा पुणे जिल्ह्यातील मोठा सोहळा व सर्व सोहळ्यातील विश्वस्त मंडळ यांची संत एकनाथ महाराजांच्या विषयी असलेली श्रद्धा व सोहळ्याचे नियोजन पाहून संत एकनाथ महाराज संस्थान पैठण च्या वतीने संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज ह भ प श्री योगेश महाराज गोसावी यांनी भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था – ह भ प श्री संतोष महाराज खेडकर यांच्या पालखी सोहळ्याच्या फडास संत एकनाथ महाराज संस्थान पैठण च्या वतीने पैठणच्या षष्ठीच्या वारीचे संस्थांनचे मानाचे फडकरी म्हणून नामांकन करून गौरव करण्यात आला. दरवर्षी या फडास पैठणमध्ये नाथ षष्ठी उत्सवामध्ये पारंपारिक फडकऱ्यांच्या सोबत विशेष सन्मान देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याच्या सर्व विश्वस्त व वारकऱ्यांना या यामुळे विशेष आनंद झाला. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले व आनंदोत्सव साजरा केला.

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

शिरुर येथील रामलिंग तसेच देव्हडेश्वर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago