शिरूर तालुक्यात कारची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा पाय फ्रॅक्चर…

क्राईम

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील उरळगाव येथे एका वाहनचालकामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. समोरुन येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. हा अपघात दि. १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

याबाबत विजय रामदास सात्रस (वय ४८, रा. उरळगाव, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा प्रणव विजय सात्रस (वय १८) हा न्हावरे येथे बाजार घेऊन घरी परत येत होता. तो त्यांच्या नावावरील हिरो स्प्लेंडर (MH 12 VU 3917) या दुचाकीवरुन तळेगाव ढमढेरे–न्हावरे रोडने जात असताना येथील पेट्रोल पंपाजवळून पुढे गेल्यानंतर अपघात घडला. समोरुन येणाऱ्या टाटा पंच (MH 12 UC 3181) या कारचा चालक राहुल भिमाजी कोळपे (रा. उरळगाव) याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकीच्या उजव्या बाजूस जोरदार धडक बसली.

या अपघातात प्रणवच्या उजव्या मांडी व गुडघ्याला फ्रॅक्चर झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत तसेच मोटार वाहन कायदा कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार पवार हे करत आहेत.

शिरुर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले…?
शिरुर तालुक्यात रात्रीच्या वेळी वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. पोलिसांची गस्त आणि कडक कारवाई न झाल्यास अशा अपघातांची मालिका थांबणार का…? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचे आयुष्य धोक्यात आले आहे. आता प्रशासन कठोर पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी