शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील व्यक्तीने मोबाईल कंपनीला दिला दणका; मिळणार रक्कम…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीने मोबाईल खरेदी केला होता. पण, मोबाईलमधील कॉल रेकॉर्डींग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकदा कंपनीकडे तक्रार केली. अखेर, जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसीमुळे रक्कम व्याजासह देण्याचा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला आहे.

मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग चालू केले की समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे समोरची व्यक्ती बोलायचे टाळतात. असे प्रकार काही मोबाईल कपंन्याकडून घडत आहे. याबाबत व्यथित होऊन मंगेश बाळासाहेब लंघे (रा. सविंदणे, ता. शिरूर) यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण आयोगात खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये दोष असल्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आयोगाने २५ ऑगस्ट २०२३ रोजी निकाल दिला असून, मोबाईल कंपनी व विक्रेता यांनी दोष असलेला मोबाईल परत घेऊन संपूर्ण रक्कम तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक ९ टक्के व्याजाने परत करण्याचे व मानसिक त्रासापोटी ५०००व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च १ हजार देण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगेश लंघे यांनी ओप्पो कंपनीचा नवीन मोबाईल खरेदी केला होता. त्याच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते जेव्हाही कॉल रेकॉर्ड चालू करत, तेव्हा समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे समोरची व्यक्ती बोलायचे टाळत असे किंवा फोन बंद करत असत. त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या सेटिंगमध्ये अनेक बदल केले. परंतु हा प्रकार दूर झाला नाही. याबाबत त्यांनी मोबाईल खरेदी केलेल्या शिरूर येथील गोविंद कम्युनिकेशन’च्या दुकानदारास तक्रार केली. परंतु, दोष कंपनीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंगेश यांनी मोबाईल कंपनीला ईमेलद्वारे व हेल्पलाईनवर तक्रार दाखल केली होती.

मोबाईल रेकॉर्डिंगचा दोष गुगलच्या डायल पॅडचा असल्याचे सांगत गुगलसोबत बोलून दोष दूर करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकदा संपर्क करून दोष दूर न झाल्याने मंगेश यांनी पुणे येथील अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला होता.

जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसला ओप्पो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हरियाना, विक्रेते गोविंद कम्युनिकेशन शिरूर यांनी उत्तर दिले नाही. आयोगासमोर हजर राहून कोणतेही म्हणणे सादर न केल्याने आयोगाने एकतर्फी निकाल दिला. मोबाईल कंपनी व विक्रेता यांनी दोष असलेला ओप्पो कंपनीचा ए-५३/६/१२८ मोबाईल परत घेऊन त्यापोटी स्वीकारलेली १५ हजार ५०० रक्कम तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक ९ टक्के व्याजाने परत करण्याचे व मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च १ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

सणसवाडीतून गेलेला मोबाईल काही तासात मुळ मालकाच्या स्वाधीन…

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago