पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिरूर तालुका

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर पालकांनी देखील शालेय मुलांना मोबाईल व दुचाकी पासून लांब ठेवावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था व माजी उपसरपंच मयूर करंजे यांच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार बोलत होते.

याप्रसंगी प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खैरे, माजी उपसरपंच मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सारिका सासवडे, मोहिनी मांढरे, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे, पतंजली समितीचे अध्यक्ष अंकुश घारे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, अतुल थोरवे यांसह आदी उपस्थित होते.

शिष्यवृत्ती मध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्राची ढाळे, वैभक्ती कांबळे, ओंकार फड, प्रतिक शिंदे, संघर्षा शिंदे यांसह त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सुरेश गंगावणे, सुभाष कुरंदळे, मुकेश कांबळे, जयश्री कोकाटे, अनुजा नरके, अंजली जगताप यांचा तसेच एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या ओंकार फड, वैष्णवी धुप्पे, पार्थ बांगर, संघर्षा शिंदे, वैभक्ती कांबळे तसेच सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या अस्मिता भोसले, आदित्य गांजवे यांसह नुकताच राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शेरखान शेख यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले तर प्रास्ताविक उपप्राचार्य सुनील थोरात यांनी केले आणि गणेश मांढरे यांनी आभार मानले.