शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) आई-वडील स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही कितीही पंचपक्वानाचं जेवण घातलं तरी ते पहायला आई-वडील नसतात. परंतु आई-वडील जिवंत असतानाचं त्यांना जीव लावा. त्यांना जपा, त्यांची सेवा करा. दुर्गे कुटुंबियांनी आईच्या अमृत महोत्सवानिमित्त जो अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला. त्याचा समाजातील इतर लोकांनीही आदर्श घ्यावा असे प्रतिपादन ह भ प गोपीनाथ महाराज जरांगे यांनी केले.

 

शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे तसेच त्यांचे बंधू गणेश दुर्गे आणि मंगेश दुर्गे यांनी त्यांच्या मातोश्री जनाबाई दुर्गे (वय ७५) तसेच शालन दुर्गे (वय ५५) यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ह भ प गोपीनाथ महाराज जरांगे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दुर्गे कुटुंबियांच्या वतीने पाहुणे मंडळीना ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ भेट देण्यात आला. यावेळी शिंदोडी ग्रामस्थांसह अनेक पाहुणे मंडळी उपस्थित होते.

 

आमच्या दोन्ही मातोश्री यांनी आमचे वडील गेल्यानंतर अतिशय खडतर परिस्थितीत आम्ही तिघे भाऊ आणि एक बहीण यांचा व्यवस्थित सांभाळ केला. आमचे शिक्षण केले. आम्हाला स्वतःच्या पायावर उभे केले. त्यामुळे त्यांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी आम्ही सर्व भावडांनी दोन्ही मातोश्री यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरवले.

विठ्ठल दुर्गे (उपाध्यक्ष) 

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटी 

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंजचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड