शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात क्रिकेटच्या स्पर्धेची रणधुमाळी चालु आहे. शिरुर तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे अनेक राजकीय पुढारी या क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रक्कम किंवा इतर बक्षीसे जाहीर करत असतात. काहीजण ती बक्षिसे देतात. मात्र काहीजण बक्षीस जाहीर करुन नंतर ती बक्षिसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक मात्र पक्के अडचणीत येतात.

 

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे दि २४ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला होता.

 

या स्पर्धेत शिरुर ग्रामीण-न्हावरे गटातील एक माजी पंचायत समिती सदस्य आणि सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या तसेच तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या अशा दोन पुढाऱ्यांनी शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत रोख रकमेची बक्षीसे जाहीर केली होती. परंतु या दोन्ही पुढाऱ्यांनी ना क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाला हजेरी लावली ना बक्षीस वितरणला हजेरी लावली.

 

त्यामुळे या पुढाऱ्यांनी जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम न दिल्याने आयोजकांची मात्र खुप धावपळ झाली. विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धा चालु असताना आयोजकांनी वेळोवेळी या राजकीय पुढाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आयोजकांना काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस मतांचा जोगवा मागायला ज्यावेळी शिंदोडी गावात येतील. त्यावेळी या लबाड पुढाऱ्यांना योग्य उत्तर देऊ असं या स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले.

 

जिल्हा परिषदला इच्छुक उमेदवाराचे मोठे मोठे बॅनर; पण बक्षीसाच्या रकमेला मात्र ठेंगा…

विधानसभा निवडणुकीनंतर शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या एका माजी पंचांयत समिती सदस्याने गटातील प्रत्येक गावात नवनिर्वाचित आमदारांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले होते. या फ्लेक्ससाठी या पुढाऱ्याने लाखों रुपये खर्च केले. मात्र क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीसाच्या रकमेला मात्र ठेंगा दाखवला.

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श

पठ्यान आईला शब्द दिला…तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार अन शब्दच खरा केला