Categories: इतर

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती…

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट green tea, Lemon tea, अद्रक , tea १ नं. गुळाचा चहा ( १०० वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,

चहाचे दुष्परिणाम….

१) दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

२) भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३) दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४) दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५) टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६) चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (१० रू/चहा असे) वर्षाचे ७२०० रू होतात. ५ वर्षाचे ३६००० रू होतात.

७) भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८) चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९) नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०) चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago