वरळीतील नाला सफाईची राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष पाहणी

महाराष्ट्र

मुंबई: मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मुंबई अध्यक्ष तथा माजी आमदार मिलिंद आण्णा कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे आणि प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी नाल्यात उतरून कामांचा आढावा घेतला.

यावेळी नाला सफाईची सद्यस्थिती, गाळ काढण्याची प्रक्रिया, जलनिस्सारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि मान्सूनपूर्व तयारीची तपासणी करण्यात आली. “मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कागदोपत्री आकडेवारीपुरता मर्यादित राहू नये. प्रत्यक्षात नाले पूर्ण क्षमतेने साफ झाले आहेत का, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

सोहेल सुभेदार यांनी “मुंबईकरांना आश्वासनांचा पाऊस नको, तर प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था हवी,” असे नमूद केले. तर ॲड. अमोल मातेले यांनी नाला सफाईची कामे प्रत्यक्ष परिणामकारक असावीत, अशी मागणी केली.यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदनही सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत