ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शिक्षक कार्यरतच नसल्याचे उघड…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली झाल्याच्या मूळ ठिकाणी कार्यरत नसून बेकायदेशीररीत्या गटशिक्षण आधिकाऱ्याला “लक्ष्मी दर्शन” देऊन तोंडी आदेशाने दुसऱ्याच सोईच्या ठिकाणी काम करत असल्याची शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चांगलीच चर्चा रंगली आहे. हे शिक्षक पगार मात्र मुळ ठिकाणचा घेत आहेत. द्विशिक्षकी […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरूर) येथील माळीवस्ती-इनामवस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवार (दि २४) सकाळी १० वाजता घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाचा तब्बल ४८ तासांनंतर शोध लागला असुन तो ओढ्यात ज्या ठिकाणी पाय घसरुन पडला तिथंच खड्यात कपारीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.   राजेंद्र विक्रम कोळी […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील माळीवस्ती परिसरातील ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (दि.२४) सकाळी १० वाजता घडली. ओढ्यातील खडकावरून दुसऱ्या बाजूला उडी मारत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला अशी माहिती त्याच्या साथीदाराने दिल्याने स्थानिक ग्रामस्थांसह, पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडच्या पथंकाने दिवसभर शोधमोहीम राबविली. […]

अधिक वाचा..

शिरुरच्या राणी कर्डीले, सविता बोरुडे, लता नाझिरकर यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 24) रोजी कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बेडकीहाळ, बेळगाव येथे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कन्नड व मराठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिरुरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे यांना […]

अधिक वाचा..

निमगाव भोगी येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आदित्यचा मानसिक छळ करुन पळुन जाण्यास व गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंपावरील सुहास वडघुले आणि […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव या गावातील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला वेळोवेळी अज्ञात आरोपींविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले […]

अधिक वाचा..
leopard

शिरुर तालुक्यात “या” गावात बिबट्यांचा मुक्त संचार, शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..