‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी व अटकेची मागणी केली आहे. या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवार, २८ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाने दिली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाचा कारभार सत्ताधारी भाजपला अनुकूल पद्धतीने सुरू असून, यामुळे जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..
Mahendra-Kothari-Family

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची मने एकमेकांशी जोडलेली असणे, सुख-दुःखात परस्परांच्या पाठीशी उभे राहणे आणि पुढच्या पिढीला प्रेम, संस्कार व आपलेपणाची शिदोरी देणे, ही खरी कुटुंबाची श्रीमंती असते. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातील मोतीबन-कोठारी परिवाराची कहाणी याच अर्थाने वेगळी आणि प्रेरणादायी आहे. सात भाऊ, त्यांचे […]

अधिक वाचा..

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा […]

अधिक वाचा..

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ११ सदस्यीय निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह विद्यमान व माजी आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, मतदारसंघातील समन्वय आणि […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने दिली. समृद्धी महामार्गालगत पाहणी करताना पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरकारने मान्य केले. मात्र, प्रत्यक्ष मदतीसाठी काढण्यात आलेला शासन निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव आर्थिक मदतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या सवलती किरकोळ असून, दुष्काळाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
pdcc-election

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६ -२०३१ या कालावधीसाठी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव कार्यक्रम पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिरूर तालुक्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..
love

वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या…

पुणे : वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून एका रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी रिक्षाचालकाला आधी कारने जोरदार धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लोखंडी पाईपने डोक्यातवर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. वाघोली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. नवनाथ […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर! हॉटेलमध्ये काम करताना अचानक घाम आला अन् काही वेळातच…

शिरूर : शिक्रापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमित रुदिदत्त सेमवाल (वय २३, सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर; मूळ रा. उत्तराखंड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सेमवाल हा शिक्रापूर येथील ‘हॉटेल नंदी’ मध्ये काम करत होता. २४ तारखेच्या […]

अधिक वाचा..

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखाचा मृत्यू; चार महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू बीड : बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती […]

अधिक वाचा..