उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे. परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. […]

अधिक वाचा..

एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी दुर्गा…

नाशिक: तुम्ही जो फोटो पाहताय त्यात बाळाला समोर बांधून रिक्षा चालवताना जी दिसतेय, त्या महिलेच नाव चंचल शर्मा आहे. बाळाला तिने कडेवर घेऊन गच्च बांधून ती ई-रिक्षा चालवते. घर चालवण्यासाठी असं करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ नाही. नवरा छळायचा. अखेर एक दिवस तान्ह्या बाळासह बायकोलाही तो सोडून गेला. पदरात असलेलं एक वर्षाचं बाळ सांभाळयचं कसं? पैसे […]

अधिक वाचा..

PFI संघटनेच्या कार्यकर्त्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा अन्यथा…

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24) रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली. त्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ आज पुण्यातील अलका टॉकीज मनसेचे नेते अजय शिंदे आणि युवा सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला. […]

अधिक वाचा..

सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. […]

अधिक वाचा..

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई आक्रमक…

औरंगाबाद: मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर टीका केली […]

अधिक वाचा..

पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता […]

अधिक वाचा..

जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा […]

अधिक वाचा..

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे; देवेंद्र फडणवीस

मुंबई: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022’ मध्ये फडणवीस बोलत होते. ‘क्रेड’ कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी […]

अधिक वाचा..

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनवणार; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..
ST

स्मार्ट बसने घेतला पेट अन…

जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून […]

अधिक वाचा..