‘ॲक्शन मोड’मध्ये सुनेत्रा पवार; पहाटेच जिल्हा रुग्णालयात धडक, बीडच्या विकासाला नवी गती

बीड : उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात विकासकामांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यांच्या या कार्यशैलीमुळे “बीडच्या विकासाचा वेग कायम राहणार” […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरून ब्लॅकमेल

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरात सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार करत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा..

TET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार […]

अधिक वाचा..

मुलुंड मेट्रो अपघात प्रकरण! दोषी कंपनीलाच पुन्हा कंत्राट? राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र संताप

मुंबई: मुलुंड मेट्रो प्रकल्पाशी संबंधित २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदार/सल्लागार कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अवघ्या दोन महिन्यांत त्याच कंपनीला पुन्हा काम देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र […]

अधिक वाचा..

लता म्हणजे आयुष्याची वेल, आशा म्हणजे जगण्याची उमेद; एकनाथ शिंदे 

  पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली जगण्याची उमेद आहे. या दोघींच्या संगमामुळे आयुष्य अधिक बहरते,” असे भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. हा समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या […]

अधिक वाचा..

महिंद्रा येणार संभाजीनगरला! १५० एकर जागेची पाहणी

छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसी परिसरातील सुमारे १५० एकर जागेची नुकतीच पाहणी केली असून ही जागा कंपनीला पसंत पडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रा–जयपूर एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनाशी संबंधित मोठा प्रकल्प […]

अधिक वाचा..

हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे…

हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर हास्य नाही, ते म्हणजे मन, मेंदू आणि शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे. हसण्याचे फायदे, वैज्ञानिक आधारासह आणि रोजच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याची सविस्तर माहिती आहे. हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे तणावमुक्ती:हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो: नियमित हसण्यामुळे […]

अधिक वाचा..

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा ठरला…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन करणार, विदीप जाधव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला अधिकृत दौरा निश्चित झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून कराड येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. यानंतर विमान अपघातात निधन […]

अधिक वाचा..

अर्थखाते न मिळाल्याचं गूढ उलगडलं! गिरीश महाजनांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः अजित पवार यांच्याकडे असलेले प्रतिष्ठित अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे न आल्याने विविध राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र या चर्चांना आता वेगळेच वळण मिळाले आहे. शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..