शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..

कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये रांगोळीतून साकारली स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची हुबेहुब प्रतिमा

शिरुर (अरुणकुमार मोटे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनशैली व चित्रप्रदर्शनानिमित्त शिरुर येथे राणी शिवाजी बनकर या गृहीणीने शिरुर-हवेलीचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांची हुबेहुब पोट्रेट रांगोळी काढली आहे. या रांगोळीतुन साकारलेले पाचर्णे यांचे हुबेहुब चित्र पाहून बनकर यांनी काढलेल्या रांगोळीचे शिरूर शहरातील नागरीकांकडून कौतुक होत आहे. राणी बनकर यांनी अनेक छंद जोपासत […]

अधिक वाचा..

दहिवडीतील विवाहितेचा सासरच्यांकडुन दहा लाखांसाठी छळ

शिक्रापुर (शेरखान शेख) दहिवडी (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या महिलेचा सासरच्या लोकांनी दहा लाख रुपयांसाठी शारीरक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंडोपंत उर्फ संतोष सोपान धायगुडे, सोपान पांडुरंग धायगुडे, अनुसया सोपान धायगुडे, मैना भरत कोळेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहिवडी येथील सारिका धायगुडे हिचा विवाह २०१९ […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना; प्रा. हेमंत गावडे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श व्यासपीठ असून युवकांनी यातून बोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. हेमंत गावडे यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. हेमंत गावडे बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर होते […]

अधिक वाचा..

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे (दि. 25) रोजी पुणे नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या […]

अधिक वाचा..

पुण्यात घडलेल्या घटनेच्या शिषेधार्थ शिरुर शहरात मनसेच्या वत्तीने आंदोलन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे का? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहतात हे मनसे सातत्याने सांगत आहे अशीच घटना काल पुणे येथे घडली असुन काही समाजकंटकांकडुन “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज (दि. २५) रोजी शिरुर शहर मनसेच्या वतीने आस्वाद हाॅटेलजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये कॉलेजच्या वतीने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरुर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी “जागतिक औषध निर्माता” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केंदूर गावचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या. निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करुन शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील भूमिपुत्र शूरवीर किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कचरा आंदोलनाबाबत ग्रामपंचायतची बैठक

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला असल्याचे समोर येत असुन आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कचरा आंदोलनाबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली आहे. शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केले असल्यामुळे ग्रामपंचायतच्या कचरा गाड्या देखील बंद झाल्याने नागरिकांच्या घरातील कचरा घरातच […]

अधिक वाचा..