pdcc-election

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६ -२०३१ या कालावधीसाठी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव कार्यक्रम पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिरूर तालुक्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचे खरे कारण तीन वर्षांनी सांगितले आहे. डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे […]

अधिक वाचा..

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ‘येत्या काही दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच राहणार नाही,’ असा दावा शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवांना […]

अधिक वाचा..

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “आमचा युक्तिवाद जोरदार झाला आहे. आपल्या विरोधात निकाल जाणार असल्याचे शिंदे गटातील आमदारांना एव्हाना कळून चुकले आहे,” असा […]

अधिक वाचा..

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवले. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरू आहे,” अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या […]

अधिक वाचा..

जयंत पाटलांनी भर सभेत पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलखुलास भाष्य; म्हणाले…

मुंबई: सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भर सभेत दिलखुलास भाष्य केले. निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत “निष्ठा फार महत्त्वाची आहे”, असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना […]

अधिक वाचा..

धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’; भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला शिवसेनेचा शह

धाराशिव : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धाराशिवमध्ये राजकीय संघर्ष रंगला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या उबाठा गटाच्या नगरसेवकांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ अचानक ‘यू-टर्न’ घेतला. त्यानंतर धाराशिवमार्गे हे नगरसेवक ठाण्यात पोहोचले आणि बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आमदार राणा जगजितसिंह […]

अधिक वाचा..

भाजपला मोठा धक्का! मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपमध्ये बंडाची ठिणगी

कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय दुर्गेश बागुल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. डोंबिवलीतील जोंधळे […]

अधिक वाचा..

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी तसेच केंद्र सरकारविरोधातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादीची दिसून येणारी मवाळ भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज […]

अधिक वाचा..

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अँड व्हाइट’ या कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे […]

अधिक वाचा..