shirur taluka dp robbery case

शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…

क्राईम

पुणेः दौंड व शिरूर उपविभागातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राहुरी येथील मामा टोळीकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर त्यांच्याकडून एकूण 5.68 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

मौजे पारगाव (तालुका दौंड) या गावाच्या हद्दीत शहाजी रुपनवर यांच्या शेतातील आणि युवराज बोत्रे यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी अज्ञात चोरट्याने 10 जुलै रोजी स्ट्रकचरवरून नट बोल्ट खोलून खाली पडून त्यातील ऑइल सांडून नुकसान केले होते. अंदाजे एकूण 280 किलोमीटर वजनाच्या ऍल्युमिनिअम तारा कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामा उर्फ मुक्तार देशमुख, विशाल काशीद, अभिषेक मोरे (सर्व रा. राहुरी, जिल्हा अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव व मारुती बाराते यांना बातमीदारमार्फत 19 जुलैला बातमी मिळाली, की राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार मामा उर्फ मुक्तार देशमुख (रा. राहुरी, जिल्हा अहमदनगर) हा त्याच्या टोळीतील साथीदाराकडून विद्युत ट्रान्सफॉर्मर डीपी चोरीचे गुन्हे करत आहे.

यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने राहुरी परिसरात पोलिस कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या मदतीने राहुरी मुलन माथा या ठिकाणी वेषांतर करून सापळा रचून देशमुख, काशीद व मोरे यांना स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेतळे. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले, की त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने पारगाव, कोरेगाव भिवर, मिरवडी मेमाणवाडी, करंदी, आपटी, डिग्रजवाडी, वाघाळे, भांबर्डे, गणेगाव खालसा, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, यवत पोलिस ठाणे हद्दीतील एकूण 11 रोहित्र डीपी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

या चोऱ्यांमधील ऍल्युमिनियम व तांब्याच्या तारा श्रीरामपूर येथील भंगार व्यावसायिक फिरोज शेख याला विक्री केल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मामा उर्फ मुक्तार देशमुख टोळीकडून दौबड व शिरूर उपविभागातील 11 विद्युत ट्रान्सफॉर्मरचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी, तसेच 110 किलो ऍल्युमिनियमच्या तारा, 350 किलोमीटर तांब्याच्या तारा व तांब्याचे त्रिकोणी ठोकळे असा एकूण 5,67,700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मामा उर्फ मुक्तार देशमुख व अभिषेक मोरे हे रेकॉर्डवरील गुन्हेगा आहेत. ही कारवाई डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अपर पोलिस अधीक्षक, बारामती विभाग, राहुल धस, उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व त्यांच्या पथकाने केली आहे.

1 thought on “शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…

Comments are closed.