शिरूर परिसरात महावितरणच्या चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोलगाव (#ता. शिरूर)येथे छापा टाकून थेट विदयुत रोहीत्रामधून विना मीटर वीज वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध धडक कारवाई केली असून, चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांमध्ये शिरूर पोलीस स्टेशन येथे विद्युत कायदा अन्वये चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सोनाली समीर टोकेकर (उपकार्यकारी अभियंता, महावितरण) यांच्या फिर्यादीनुसार संजय दामोदर वाखारे, रा. गोलेगाव यांनी कालावधी: 27 मे 2024 ते 26 मे 2025 या दरम्यान 1617 युनिट वीजचोरी करून अंदाजे 30,100 रुपयाची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे हे करत आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये केशव गायकवाड, रा. गोलेगाव यांनी 707 युनिटची चोरी करून12,810 रुपयांची विजचोरी केल्याचा गुन्हा दाखल केला असून या गुन्हाचा पुढील तपास पो.हवा. टेंगले हे करत आहे. तिसऱ्या घटनेमध्ये आलम रुखवेद शेख यांच्यावर

746 युनिटची विजचोरी करून 13,340 रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस हवालदार टेंगले हे पुढील तपास करीत आहे .चौथ्या प्रकरणांमध्ये सोमनाथ यशवंत गायकवाड रा. गोलेगाव यांच्यावरही 746 युनिटची वीजचोरी करून तब्बल 12,810 रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा सोनाली समीर टोकेकर यांनी दाखल केला आहे.

गोलेगावमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ माजली असून विजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून वीज चोरांवर यापुढे अशी धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरण स्पष्ट केले आहे.

प्रत्येक घटनेत फोटोग्राफ्स, पंचनामे, स्थळ तपासणी अहवाल व असेसमेंट शीटच्या आधारे महावितरणने सिद्ध माहिती सादर केली आहे. संबंधित आरोपींनी गेल्या १२ महिन्यांत थेट डीपीमधून विना मीटर वीज वापर केल्याचे उघड झाले.या चार प्रकरणांमध्ये एकूण अंदाजे 69,060 रुपये इतक्या वीजचोरीचा आढावा घेतला गेला आहे.महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे की, वीज वापर नियमबाह्य न करता अधिकृत कनेक्शनचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.