cash
मंचर (कैलास गायकवाड) : जुन्नर आंबेगाव उपविभागचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे (४६ वर्ष ) यांना दोन लाख रुपयाचे लाच घेताना अँटीकरप्शन ब्युरो पुणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून एका भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. नारायणगाव येथे संयुक्त भागीदारीमध्ये बांधकाम सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर औषध पूर्णत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्यानंतरही प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता. दिनांक २७ मार्च रोजी तक्रारदार चौकशीसाठी गेले असता आरोपी शिंदे यांनी प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने दिनांक २४मार्च रोजी अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार २७ मार्च रोजी पडताळणी कारवाई करण्यात आली.
आरोपी शिंदे यांनी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीनंतर येथील उपविभागी कार्यालयात स्थापना करण्यात आला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
भाजप आमदार चंद्रू लमाणी लाच प्रकरणात अटकेत; 5 लाख स्वीकारताना रंगेहात पकडले
मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा
शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
शिरूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लाचखोरीचा सुळसुळाट; ‘खाजगी कर्मचारी’ साहेबांचा खास माणूस
शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…