क्राईम

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सुभाष सीताराम शितोळे यांनी याबाबत शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा आऊट पोस्टमध्ये फिर्याद दाखल केली आहे. गावातील इतर व्यक्तींशी संपर्क साधला असता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नदीकाठावरील विद्युत पंप चोरीच्या घटना वारंवार होत असल्याचे सांगितले. पारगाव पुलाजवळील बंधाऱ्याजवळ परिसरातील नागरगाव, आंधळगाव, रांजणगाव सांडस या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीकाठी एकाच ठिकाणी अंदाजे चाळीस, पन्नास विद्युत पंप बसविले आहेत. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी येथील विद्युत पंपाचे पाइप कापून विद्युत पंप चोरून नेले आहेत. तसेच, दोन पाइप कापलेले विद्युत पंप जागेवरच सोडून चोरट्यांनी पळ काढला.

सुभाष पांढरे, गोपाळ भगवान साठे, सुनील रामदास साठे, शिवाजी किसन शेलार, चौरंगनाथ खंडेराव शेलार, संतोष कुल, ऋषिकेश शितोळे, विभीषण खुळे, भाऊ खुळे, अप्पासाहेब कोंडिबा साठे, सीताराम नलगे, सुभाष शितोळे या शेतकऱ्यांच्या नदीकाठी असणाऱ्या विद्युत पंपाची चोरी झाल्याचे सांगितले आहे.. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहेत…

शिरूर पोलिस स्टेशनला एक महिन्यापूर्वी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पदभार घेतला आहे. दबंग पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वी त्यांनी अनेक कठीण गुन्ह्यांची उकल केली असून, त्यांच्यापुढे आता विद्युत रोहीत्र, विद्युत पंप, केबल या चोऱ्या रोखण्याचे व चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

केंदुरमध्ये विद्युत पंप चोरट्यांच्या हैदासाने शेतकरी हैराण…

शिरुर पोलिसांनी बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी केली गजाआड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

5 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago