Shikrapur Police Station

शिक्रापूरात महिलेच्या फसवणूक व सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका महिलेला व्याजाने पैसे देऊन महिलेची जागा स्वतःच्या नावावर करुन घेऊन महिलेले सर्व पैसे व्याजासह परत केल्यानंतर देखील महिलेची जमीन महिलेला परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर सासवडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सागर सासवडे या युवकाकडून संगीता फाळके व त्यांचा जावई श्रेयस पंडित यांनी २०२० मध्ये दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. दरम्यान सागर याने सदर महिलेच्या नावे हवेली तालुक्यातील कोलवडी येथील काही जमीन नावावर करुन घेतली आणि पैसे परत केल्यानंतर पुन्हा महिलेच्या नावे करुन देण्याचे ठरले. त्यानंतर महिलेने सर्व पैसे व्याजासह परत देखील केले. मात्र सासवडे यांनी त्यांचे नाव 7/ 12 ला नोंद करुन घेतले.

महिलेने पैसे परत केल्यानंतर पुन्हा जमीन नावावर करुन देण्याची विनंती केली असता सागर याने सध्या जमिनीची किंमत नव्वद लाख रुपये आहे तुम्हाला जमीन पाहिजे असेल तर मला 90 लाख रुपये द्या, असे सांगितले तसेच फाळके यांचे जावई श्रेयस पंडित यास चारचाकी वाहनामध्ये बसवून शिक्रापूर येथे आणून तुम्हाला जमीन पाहिजे असेल तर मला नव्वद लाख रुपये डे असे म्हणून मारहाण केली.

याबाबत संगीता अश्रू फाळके (वय ४७) रा. शिंदेवस्ती केशवनगर मुंढवा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सागर सासवडे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध सावकारी व फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.