arrest
शिरूर : शिरूर तालुक्यातील खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून येऊन, घराचे दरवाजे तोडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका सराईत दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे २ आणि जबरी चोरीचे ३ असे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
अनिरुद्ध किरण भोसले (वय ३०, रा. बीड), निकेश रोहिदास काळे (वय ३०, रा. शिरूर) आणि विकी संजय काळे (वय ३०, रा. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या टोळीने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी खैरेनगर येथे बाळू खैरे आणि सुनील खैरे यांच्या घरावर दरोडा टाकला होता. यावेळी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून आणि काठीने मारहाण करून सुमारे ४ लाख ४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली होती.
या टोळीत एकूण ६ जणांचा समावेश असून, उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींचे गुन्हेगारी स्वरूप पाहता या प्रकरणात ‘संघटित गुन्हेगारी’ (MCOCA सारखी वाढीव कलमे) लावण्यात आली आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…
शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…
शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?
Video: शिरूर तालुक्यात गोठ्याला मध्यरात्री भीषण आग; बैलगाडा शर्यतीतील दोन बैल होरपळले…
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…