शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे.
सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मृत्यू झालेल्या मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा पोलिसांनी सर्व बाजुने तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत पुणे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितले की, शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला आहे. त्याच्या शरीरावर जखमा होत्या, त्यानुसार आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षापूर्वी अशी घटना घडल्याची माहिती मिळतं आहे. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची शंका त्यावेळी व्यक्त केली. मात्र आता त्या घटनेबाबत देखील सखोल तपास होईल, या आत्ताच्या घटनेच फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर त्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे, याबाबत तपास सुरू आहे. यावेळी आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, तपासात काही गोष्टी समोर येतील, तपासात सर्व निष्पन्न होईल. या घटनेचा तपास सुरू आहे, त्या मुलाच्या शरीरावरती काही खुना आहे. दोन्ही घटनांचा तपास केला जाणार आहे, वस्तुस्थिती आहे त्याबाबत तपास सुरू आहे.’
View this post on Instagram
वाढती गुन्हेगारी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमध्ये असलेला समावेश याबाबत बोलताना गिल म्हणाले की, काही अल्पवयीन मुले आहेत. यांची जनजागृती करत आहोत. शाळेत हल्ल्याच्या घटना होत आहेत, पण शाळेत जाऊन पोलिसांना बॅग चेक करणे शक्य नाही, माहिती मिळाले तर ठीक आहे. पालकांनी आणि शिक्षणाची यांची लक्ष दिले पाहिजे. गुन्हेगाराच्या प्रवृती मागे अल्पवयीन मुले जात आहे, यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजचे आहे. आम्ही शाळेत जाऊन आव्हान करतोय, मात्र पालकांनी शिक्षणाची यात मार्ग काढला पाहिजे. अल्पवयीन मुले गाडी चालवत असतील आणि गाड्यांना काळया काचा आतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजचे आहे.’
दरम्यान, दहिवडी जवळल मांजरेवस्ती येथे मंगळवारी एकच खळबळ उडाली. साईराज गणेश मांजरे (वय १२) याचा मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. पण आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. एका विहिरीपाशी त्याचा मृतदेह रक्ताळलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेत सापडला. त्याच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
View this post on Instagram
शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भावकीतीलच एका युवकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून या नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे.
शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…
धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी याच शेतात याच जागेवर वर्षभरापूर्वी 11 वर्षीय यश गायकवाड या मुलाचा मृतदेह अशाच अवस्थेत आढळला होता. त्यामुळेच आता पुन्हा अशाच पद्धतीने मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पोलीस आता अधिक गांभीर्याने तपास करत असून, तपासात अनेक गोष्टी स्पष्ट होतील असा विश्वास गिल यांनी व्यक्त केला आहे.
शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…
शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…