शिरुर (तेजस फडके) वाटाणा सोलण्याचा तसेच पनीर तयार करण्याचा आम्ही प्लांट टाकणार असुन त्याकरीता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर घेउन त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देऊ असे खोटेनाटे सांगून दोन महिलांची १ कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे (रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड) या तीन जणांविरोधात सविता अशोक मेसे (वय ४८) रा. स्वामी छाया फेज २, फ्लॅट नं १९, विठ्ठलनगर, शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे या तिघांनी फिर्यादी सविता मेसे यांच्या घरी जाऊन आम्ही वाटाणा सोलण्याचा तसेच पनीर तयार करण्याचा प्लांट टाकणार असुन त्याकरीता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये भागीदारी देऊ आणि त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देऊ असे खोटेनाटे सांगत फिर्यादी सविता मेसे आणि त्यांच्या मैत्रिणीकडुन १ कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रुपयांची रक्कम स्वतःच्या फायदयाकरिता घेऊन फसवणुक केली आहे.
त्यामुळे फिर्यादी यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे वरील तिघा जणांविरुद्ध फसवणुकिचा गुन्हा दाखल केला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.
शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक
शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?
शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून