dilip-walse-patil
शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. www.shirurtaluka.com ने घेतलेली मतचाचणी आणि नागरिकांशी साधलेल्या संवादावरुन दिलीप वळसे-पाटील यांना यंदाची निवडणूक काही प्रमाणात जड जाणार आहे.
दिलीप वळसे-पाटील हे शिरुर-आंबेगाव मतदार संघातुन २००९ पासुन निवडणूक येत आहेत. पण, यंदाची निवडणूक त्यांना म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही. कारण एकेकाळी त्यांचेच जवळचे सहकारी असलेले देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील शिरुर तालुक्याच्या ४२ गावातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असुन या भागातील शेतकरी वळसे पाटील यांच्यावर प्रचंड नाराज असुन प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याचे नागरिकांना खटकत असून, अनेक जण तसे बोलूनही दाखवत आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षांतराचा फटका बसला आहे. शिवाय, दिलीप वळसे-पाटील यांचा शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील नागरिकांशी फार कमी संवाद आहे. निवडणूक आल्यानंतरच वळसे पाटलांना आमची आठवण येत असल्याची भावना काही नागरिक बोलून दाखवत आहेत. तसेच ४२ गावात वळसे पाटील पवार, पाचुंदकर आणि गावडे या कुटुंबातील व्यक्तींच्याच इशाऱ्यावर सगळ्या गोष्टी करतात असा आरोपही अनेकजण खाजगीत करत आहेत.
दरम्यान, सन २००९ मध्ये शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव तालुक्याला जोडली गेली. त्यानंतर काही वर्षांनी तीन ग्रामपंचायत विभक्त झाल्याने या गावची संख्या ४२ झाली. सलग १५ वर्षे शिरुर तालुक्यातील ४२ गावच्या सर्वसामान्य मतदारांनी दिलीप वळसे पाटील यांना सलग तीन वेळा विधानसभेत पाठवले. परंतु, शिरुर तालुक्यातील पाबळ, केंदुर, कान्हूर मेसाई सह १२ गावचा पाणीप्रश्न मात्र ‘जैसे थे’ च राहिला. त्यामुळे या १२ गावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील यांना बसण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.
Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…
शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…
दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…