मुख्य बातम्या

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड…

पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून, मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना मंगळवारी (ता. २०) रात्री साडे अकराच्या सुमारास अटक करून मुंबईला घेऊन गेले आहेत. त्यांना आज (बुधवार) दुपारी न्यायालयात हजर केले जाईल. ईडीच्या कारवाईमुळे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातल्या निवासस्थानी ईडीने मंगळवारी छापे टाकले होते. त्यांची १६ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. शिक्रापूर आणि पुण्यात महमंदवाडी येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. यात बांदल यांच्या पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांची ईडीने चौकशी केली. महंमदवाडी येथील बंगल्यात मंगलदास बांदल यांचीही ईडीने चौकशी केली होती.

दरम्यान, पैलवान म्हणून परिचित असलेले मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. त्यांना २०२० मध्ये ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आक्रमक भाषणातून बांदल चर्चेत राहिले होते. बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आली आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मंगलदास बांदल आत्तापर्यंत ईडीसमोर चारवेळा हजर झाले आहेत. त्यानंतर आता पहिल्यांदात हा छापा टाकण्यात आला आहे. मंगलदास बांदल हे पुण्यातील महंमदवाडी भागातील त्यांच्या घरी होते. त्याचवेळी शिक्रापूरमध्ये असलेल्या घरीही छापा टाकण्यात आला. अत्यंत गोपनीय पद्धतीने ईडीने छापा टाकला, त्यामुळे सुमारे दोन कि.मी. परिसर त्यांनी सील केला होता. कोणालाही घरात जाण्यास व बाहेर येण्यास परवानगी नव्हती.

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वी बांदल यांना ईडीने एक वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. चौकशीसाठी ते चार वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजरही राहिले होते. चौकशीला चांगले सहकार्य करीत होते. याशिवाय तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी सध्या जामीनावर बाहेर आहेत.

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड…

शिरूर लोकसभेतील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; कारण…

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण…

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

12 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

12 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

12 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

12 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago