murum-chori

शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी?

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात मुरुम, वाळू या अवैध गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलठण मार्गे टाकळी हाजीकडे राजरोसपणे मुरूमाची दिवसाढवळ्या हायवा गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात सुरू आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे करुन कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील परिसरात गेल्या काही महीन्यांपासून रांत्रदिवस राजरोसपणे मोठया प्रमाणावर वाळू उपसा, मुरुम उपसा व वाहतुक सुरु आहे. महसुल विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

टाकळी हाजी व परीसरात सध्या नवीन रस्त्यांची, तसेच नवीन बांधकामे सुरु आहे. त्यासाठी अनाधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास वाळू उपसा, मुरुम ऊपसा जोरदाररीत्या सुरु आहे. हायवा गाडयांमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात मुरुमाची ओव्हरलोड वाहतुक केली जात आहे. ओव्हरलोड गाडयांमुळे रस्त्यांची वाट लागत आहे.

गौणखनिज माफियांना वाचवण्याच्या प्रयत्न होत असून, अजूनपर्यंत कारवाई का होत नाही? महसुल प्रशासणाने मुहुर्त शोधून तातडीने बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांचे तातडीने पंचनामे करुन योग्य कारवाई करण्याची मागणी परीसरातून होत आहे.
(क्रमशः)

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी