शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे मुरूम विक्री होत आहे. महसुल प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका प्रमुख शिवसेना शेतकरी सेना शिरुर बाळासाहेब एकनाथ शेळके यांनी केला आहे.

यापूर्वी देखील ही सदर गटावर उत्खननाचा पंचनामा झाला होता. जमिन मालक प्रविन ज्ञानोबा दरवडे व गणपत दौलत नरवडे यांनी कुठल्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता हजारो ब्रास मुरूम उत्खनन करुन मुरुम विक्री केलेला आहे. एटीएस मशिनच्या सहाय्याने मोजणी करुन पंचनामा होऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी शिरूर तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत तलाठी यांच्या संपर्क केला असता ते म्हणाले की, मशिन किंवा वाहतुक करणारा ट्रक भेटला तरच कारवाई करता येईल. त्या गटातील मुरुम त्याच गटात टाकला असेल, अशी उडवाउडवीची उत्तरे ते देत आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऊत्खखन करून विक्री केल्याप्रकरणी कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे बाळासाहेब शेळके यांनी सांगितले आहे.