Shirur Police Station
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चांडोह येथे एका महिलेनं चोरांच्या भीतीनं आपले दागिने किचनमध्ये ठेवले होते. मात्र, डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. पण, शिरूर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या चोरीचा छडा लावला. मात्र जेव्हा खरा चोर समोर आला, तेव्हा स्वतःच्या मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करून ९ लाखांहून अधिक किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
चांडोह येथील दत्तात्रय बबन जाधव यांच्या बंद घराच्या किचनमध्ये स्टीलच्या डब्यात नऊ तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. २८ एप्रिल रोजी हे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच कुटुंबात खळबळ उडाली. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपासासाठी तातडीने पथक रवाना केले. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती गोळा केली.
पोलिसांना तपासादरम्यान घरातीलच व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी रवींद्र दत्तात्रय जाधव (वय ३३) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रवींद्रने गुन्ह्याची कबुली दिली. आई-वडील घरी नसताना त्यानेच किचनमधील डब्यातून दागिने लंपास केले होते.
शिरूर पोलिसांनी १४ तासांच्या आत रवींद्रला अटक करून त्याच्याकडून नऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि त्यांच्या पथकाचे परिसरात कौतुक होत आहे. मात्र, स्वतःच्या मुलानेच अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…
पत्नीच्या सांगण्यावरून पतीवर हल्ला; शिरूरमध्ये खळबळ
शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…
Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन
शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची…
शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…
तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…
संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…
पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…
SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…