एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

आरोग्य

अनेकजण दिवसाची सुरूवात एक कप गरमागरम चहाने करतात. शिवाय, दिवसातून कितीतरी कप चहा पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, चहाचं अधिक सेवन केल्याने वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात…

स्ट्रेस दूर होईल
अनेकजण स्ट्रेस कमी करण्यासाठी अनेक कप चहा पितात. पण चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन हे तत्व असतं. याचं जास्त सेवन केल्याने स्ट्रेस वाढतो. अनेक झोप न लागण्याची समस्या देखील होते. अशात तुम्ही एक महिना चहा बंद केला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळेल.

पचन तंत्र चांगलं होईल
चहाचं जास्त सेवन केल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. अशात तर तुम्ही एक महिना चहा न पिण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंग, छातीत जळजळ अशा समस्या होणार नाहीत.

चांगली झोप येईल
एक्सपर्ट सांगतात की, चहाचं जास्त सेवन केल्याने झोप प्रभावित होते. याला कारण चहामधील कॅफीन हे तत्व असतं. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर एक महिना चहा सेवन बंद करून बघा. याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल.

डिहायड्रेशनची समस्या होणार नाही
जर तुम्ही एक महिना चहाचं सेवन बंद केलं तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही. चहामधील कॅफीन शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करतं. शरीरात पाणी कमी झालं तर वेगवेगळ्या समस्या होतात.

हर्बल चहा फायदेशीर
ज्या लोकांना चहा पिण्याची खूप जास्त सवय असते त्यांना चहा सोडल्यावर काही समस्या होऊ शकतात. अशात असे लोक हर्बल चहाचं सेवन करू शकतात. जर तुम्ही खरंच एक महिना चहाचं सेवन बंद केलं तर शरीरात भरपूर बदल दिसून येतील.

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे