ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे, हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे. उन्हाळा सरत सरत पावसाळ्याची चाहूल सगळीकडेच लागली आहे. अनेक ठिकाणी मान्सून ट्रेक्स आणि पर्यटनाचे प्लॅनिंग सुद्धा सुरु झाले आहे. पावसाळ्यात नेमका डाएट कसं सांभाळावं हा प्रश्न सर्रास विचारला जातो. पावसाळ्यात महत्वाचं असतं ते पाण्यामुळे होणारे आजार न होऊ देणं. उन्हाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती थोडी संथ होते आणि त्यामुळेदेखील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. पावसाळ्यात प्रथिनांचं प्रमाण मोजकं ठेवावं….
कोबी, फ्लॉवर टाळा
पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा, भेंडी, तोंडली, गाजर ,बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. पालेभाज्या चोखंदळ निवडाव्यात. शक्यतो कांद्याची पात, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कमी खाव्यात. यातील पाण्याचे प्रमाण संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सोबत घेऊन येते. त्यामुळे या भाज्या न खाणे उत्तम.
तळलेले पदार्थ, सूप आणि भाजी
पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे.
हळद
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे उत्तम. शक्यतो रात्री झोपताना हळद-दूध प्यायल्यास उत्तम झोप लागू शकते. ज्यांना हॉर्मोनल / शारीरिक ग्रंथींचे विकार आहेत त्यांनी रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चिमूट हळद एकत्र करून हे पाणी नक्की प्यावे.
मसाला चहा
भारतीय मसाल्यांचे- त्यातील योग्य मसाल्याच्या पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण चहासोबत एकत्र करून आपला नेहमीच चहा आणखी आरोग्यदायी ठरू शकतो . विशेषतः त्यात साखरेचे प्रमाण शून्य ठेवणे केव्हाही उत्तम. उदाहरणार्थ चहामध्ये आलं, वेलदोडे , बडीशेप, दगडफूल, चहाची पात, गुलाबाच्या पाकळ्या यासारखे पदार्थ एकत्र केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि पावसाळ्यातील चहाची तल्लफ पूर्ण होण्यास मदत होते.
लसूण
हिरव्या लसूणपातीचा पराठा, मिरची- लसूण ठेचा, लसूण चटणी यांना भारतीय आहारात महत्वाचे स्थान आहे. पावसाळ्यात विशेषतः तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास आहारात लसूण जरूर समाविष्ट करावी. शरीरातील चयापचय क्रिया वाढविणारे आणि रोगप्रतिकारशक्ती शाबूत राखण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे.
मक्याचे कणीस
पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं जवळच नातं आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यासोबत एक वाटी उकडलेली कडधान्ये जरूर खावीत. मक्याचे भाजलेले कणीस खाताना अतिरिक्त मीठ आणि मसाले टाळावेत. गोडसर चवीचे कणीस एका वेळी तुम्हाला भरपूर प्रमाणात कर्बोदके देऊ करते, त्यामुळे आहारात कणीस असल्यास इतर पदार्थ प्रथिनांनी भरपूर असणे आवश्यक ठरते.
बेसन
पावसाळ्यात भजी या प्रकाराला अवाजवी महत्व येतं. गरम आणि चटकदार या दोन मुद्द्यांचा विचार करता भजीला प्रदान केलेलं महत्त्व समजण्याजोगं आहे. मात्र तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तुम्हाला पचनाचे विकार असतील तर भजीच काय कोणतेही तळलेले पदार्थ कोणत्याही ऋतूत अतिरेकी प्रमाणात वर्ज्य करणे उत्तम! बेसनची कढी, बेसनाचे धिरडे / पोळे / चिला /विविध भाज्या एकत्र करून केलेले बेसनाचे पदार्थ खाणे उत्तम!
उकळलेलं पाणी
पावसाळा आणि आजारपण यांचं विशेष नातं आहे. पावसाळ्यात पाण्यातून संसर्गजन्य आजार वेगाने बळावतात. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून घेणे महत्वाचे ठरते. तसेच भाज्या खाताना त्याचे सूप, शिजवलेल्या भाज्यांची कढी अशा स्वरूपात भरपूर पाणी असणारे पदार्थ पिणे उत्तम!
पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…
पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…
घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…
दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…
मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…
डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…
मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे
साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे
पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…