karale

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

आरोग्य

कारले चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते नकोसे वाटते. पण, या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, कारल्याचे रोज सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. कारल्यामध्ये आढळणारे विशेष गुणधर्म इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.

हृदयविकाराचा कमी धोका
कारलं हा हृदयाशी संबंधित समस्यांवर उत्तम उपाय आहे. खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका देखील खूप कमी होतो. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्व देखील असतात जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात.

रक्त शुद्ध करतं
कारल्याच्या सेवनाने शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्यामुळे रक्ताशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कारल्यामध्ये अल्फा-लिपोइक एसिड नावाचे औषधी गुणधर्म देखील असतात, जे रक्तातील चरबी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सरचा कमी धोका
कारल्यातील फ्लेव्होनॉइड्स, गार्डनिया आणि बीटा-कॅरोटीन सारखे केमिकल कम्पाऊंड कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅन्सरशी लढण्यासाठी कारल्याचा रस सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त
कारलं केवळ मधुमेहच नाही तर बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. कारल्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे