महाराष्ट्र

मतदान कागद-पुसकी शाई हे कुणाला भीतच नाही

दगड की माती? लोकशाही सन्मानाने विकसित रहावी 

मुंबई शितल करदेकर): लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. कारण याच प्रक्रियेतून नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येतो आणि आपल्यासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडता येतात. मात्र हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे भान अनेकदा विसरताना दिसते. तांचा जोगवा मागताना साधेपणा, नम्रता दाखवणारे अनेक जण निवडून आल्यानंतर मात्र बादशाही थाटात वावरू लागतात. ज्यांच्या मतांवर ते निवडून आले, त्या मतदारांना ठरावीक दिवशी भेटायलाही टाळाटाळ होते. समाजकारण बाजूला पडते आणि राजकारण, पक्षीय स्वार्थ, कार्यकर्त्यांचे समाधान व सणासुदीला दिखाऊ मदत यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहते.

लोकप्रतिनिधी म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अनेक जण विसरतात. राजकारण जर जनहिताचे माध्यम राहिले नाही, तर जनता योग्य वेळी जागा दाखवतेच. निवडणूक जिंकण्यासाठी सुरू असलेल्या कसरती आपण पूर्वी चित्रपटांत पाहत होतो. मात्र अलीकडच्या काळात थेट पक्ष फोडणे, आमदार-नगरसेवक पळवणे, माणसं फोडणे असे प्रकार उघडपणे घडताना दिसत आहेत. जिंकण्यासाठी काहीही अशी मानसिकता राजकारणात उतरली आहे.

मतदार यादी अचूक असेल, मतदानाची यंत्रणा पारदर्शक व विश्वासार्ह असेल, तर निवडणूक प्रक्रिया उत्तम होऊ शकते. मात्र याठिकाणीही अनेक घोळ होत असल्याचे चित्र दिसते. याच पार्श्वभूमीवर अलीकडे चर्चेत आलेला विषय म्हणजे पुसली जाणारी मतदानाची शाई. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “उद्यापासून पाडू, ईव्हीएम, पुसणारी शाई यावर चर्चा सुरू होईल,” असे विधान केले. प्रश्न असा आहे की, निवडणूक स्वच्छ, विश्वासार्ह आणि पारदर्शक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची अपेक्षा सरकारकडून व आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाकडून नसेल, तर ती कोणाकडून असावी. या निवडणुकीत मतदान यंत्रणेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या. त्यातच पुसली जाणारी शाई हा गंभीर मुद्दा समोर आला. निवडणुकीची जबाबदारी असणारे वाघमारे म्हणतात, “शाई पुसून कोणी दुबार मतदान केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.” तर मुख्यमंत्री म्हणतात, “ऑईल पेंट लावायला हवे.”

खरंच, ‘मतदार राजा’ची ही चेष्टा नाही का? थेट फुसकट शाईपर्यंत विषय जाण्याचे कारण काय? हा विषय अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये शाई घोटाळा झाला आहे, असा आरोप करत प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत आष्टिकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने कोरस इंडिया कंपनीचे अवघ्या १० रुपयांचे मार्कर वापरून दुबार मतदानाला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी जर्मनीत तयार होणारी ‘परमनंट वॉटरप्रूफ रोटरी इंक’ वापरली जात होती. (२३ मि.ली.ची किंमत सुमारे ५०० ते ५५० रुपये.) मग यावेळी अवघ्या ५–१० रुपयांचे, सहज पुसता येणारे मार्कर पेन का वापरण्यात आले.

याबाबत आष्टिकर म्हणतात, “हे दुबार मतदानास सहकार्य करण्यासाठी नियोजनबद्ध कट आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.” या तक्रारीत राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि या लोकशाहीच्या उत्सवात जनतेची फसवणूक करणाऱ्या रॅकेटवर कठोर कारवाईची तसेच निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढील काळात राज्यभर जिल्हानिहाय तक्रारी दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खरंच, पैसे लोकांचे, मते लोकांची मग या निवडणुकीत ‘लो-बजेट’ शाई का? हा प्रश्न विचारणे गुन्हा नाही. यात कोणतेही वैयक्तिक वैर नाही. निवडून येणारे सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते जनतेसाठी विश्वस्त असते. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील प्रत्येक बाब पारदर्शक, विश्वासार्ह आणि संशयमुक्त असणे ही प्रामाणिक नागरिकांची अपेक्षा व जबाबदारी आहे. किमान आपले प्रतिनिधी जबाबदारी पूर्ण करणारे, प्रामाणिक असावेत लबाड नसावेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

3 मिनिटे ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

16 मिनिटे ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

21 मिनिटे ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

24 मिनिटे ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

2 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

4 तास ago