शिरूर (तेजस फडके): राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे. या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते. हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण, अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा माजी मंत्री शरद पवार यांच्या गटामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवाय, दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हे यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन”, असा मजकुर टाकत त्यांनी सोशल मीडीयावर खासदार कोल्हे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय!
मनःपूर्वक अभिनंदन !@kolhe_amol @NCP_Party1 👏💐 #Congratulations #ShirurLokSabha pic.twitter.com/vQp0tSNf2A— Purva Walse Patil -NCP (@PurvaWPatil_FC) June 7, 2024
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. तर पूर्वा वळसे पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच अजित पवार गटाला इशारा दिला आहे. ‘अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल,’ असा दावा रोहित पवारांनी केला आहे. ‘आमच्यातील काही लोकं रात्री-बेरात्री जाऊन महायुतीच्या नेत्यांशी सेटिंग करत होते त्यांचे नावं लवकरच जाहीर करणार आहोत. अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात येणार हे येत्या 15 दिवसात दिसणार नाही, पुढच्या 15 दिवसात त्यांना निर्णय घ्यावे लागणार”, असे मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सुप्रियाताई सुळे यांचे खूप खूप अभिनंदन 💐 👏💥
आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.@SupriyaSule_ @NCP_Party1 #Congratualtions #BaramatiLokSabhaElection pic.twitter.com/ei5PtjByaE— Purva Walse Patil -NCP (@PurvaWPatil_FC) June 7, 2024
खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पुर्वा वळसे पाटील यांच्याकडुन विजयाच्या शुभेच्छा अन चर्चांना उधाण…
शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी…
शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद…
शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…
मोठी बातमी! शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का…
मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…
दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…
दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…
दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…
शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…