त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपोत्सव

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य दिपोत्सव व विद्युत रोषणाई करत विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मवीर संभाजी महाराजस्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरील दिपोत्सव कार्यक्रमात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते पहिला दिवा पेटवून सदर दिपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार काशिनाथ गरुड साहेब, संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास मोरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, रमाकांत शिवले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे यांसह आदी पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक गावातील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी अनेक महिला, धारकरी तसेच गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ देखील उपस्थित होते. तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने अविनाश मरकळे, हरी शिवले, निखिल गव्हाणे, स्वप्निल शिवले, सोमनाथ शिवले यांसह आदी धारकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी समाधी स्थळाच्या बाहेर दिव्यांनी धर्मवीर नाव रेखाटत घोषणा देखील देण्यात आल्या तसेच समाधी स्थळावर फटाक्यांची आतशबाजी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने समाधीस्थळ विद्युत रोषणाई व दिव्यांनी आकर्षित झाले होते.