शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, फोटो टपाल तिकिटावर येण्यासाठी अनेक दिवसापासूनची माझी धडपड चालू असुन लवकरच हे तिकीट येणार आहे. याबाबत केंद्र शासन सकारात्मक असल्याची माहिती सोनवणे यांनी सांगितले. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गिरीश बापट यांच्याशी लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्रामध्ये हिंदुस्थानातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याप्रति असलेले कार्य महान आहे. तसेच त्यांचे आचार विचार आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या महान कायार्चा विचार करुन त्यांचे टपाल तिकीट तयार व्हावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली होती.
या लेखी स्वरुपातील पत्राचा विचार करुन केंद्र शासनाने तुमची मागणी रास्त आहे, तुमच्या मागणीचा विचार (पीएसी) कमिटी मध्ये मांडून त्यावर सखोल विचार केला जाईल, तुम्ही दिलेले लेखी पत्र आम्हाला पोहोचले असुन आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यावा, असे सकारात्मक उत्तर सोनवणे यांना मिळाले आहे.