एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते

काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला ‘अल्लाकी मर्जी’ असे म्हटले जात असे. पण आता हा विकार आटोक्यात आला आहे. ऍलर्जी अन्नाची, कुत्र्या-मांजरांची, धुळीची, धुराची, फुलांमध्ये असलेल्या परागकणांची, सेंटची, सौदर्य प्रसाधनांची, झुरळांची, एखाद्या विशिष्ट किड्याची, स्वयंपाक घरातल्या बुरशीची अशी कशाचीही असू शकते. तसेच ती […]

अधिक वाचा..

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

अ‍ॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात. अ‍ॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा ‘अ’ पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोटया श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून […]

अधिक वाचा..