काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करा; पवन खेरा

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांच्यावर एफआयआरही दाखल […]

अधिक वाचा..

मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस उद्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार 

मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य […]

अधिक वाचा..

काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा…

मुंबई: महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

पालिकेच्या गलथान कारभारा विरोधात कॉंग्रेसचा मनपा पी/ उत्तर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

मालाड: रस्त्यांवर पडलेले खड्डे, अशुद्ध पाणी पुरवठा, विकास कामांमधील दिरंगाई अशा विविध विषयांवरुन पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज कॉंग्रेस मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपा पी/ उत्तर विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य हैदरअली शेख आपल्या भाषणात म्हणाले, […]

अधिक वाचा..

देश कसा चालवायचा हे दीपक केसरकरांनी काँग्रेसला शिकवू नये; अतुल लोंढे

मुंबई: काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकारे चालवली आहेत, त्यामुळे देश कसा […]

अधिक वाचा..

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज; नाना पटोले

मुंबई: देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

काँग्रेस आमदारांना दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ; नाना पटोले

मुंबई: आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास निधी नाही दिला तर […]

अधिक वाचा..

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या […]

अधिक वाचा..