आमटे दांपत्याचा सन्मान केल्यामुळे ‘महाराष्ट्र भूषणचे’ भूषण वाढले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात आयुष्य वाहून आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मटा सन्मान २०२६ सोहळ्यात या दांपत्याला ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले असून हा सन्मान देण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी […]

अधिक वाचा..

‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड-

मुंबई: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना […]

अधिक वाचा..

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे राज्यातल्या तेरा कोटी जनतेचं त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक

राम सुतारांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हाराज्याच्या इतिहास, कला, समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले […]

अधिक वाचा..