‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यावरील सुमारे १०० फूट उंच बुरुजावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच […]

अधिक वाचा..

न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त; राज्यपालांच्या हस्ते शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा वयाची ७० […]

अधिक वाचा..

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयात […]

अधिक वाचा..

कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा! दादांची विकासदृष्टी पुढे नेणार; सुनेत्रा पवार

रोहा: “कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी कष्टाने ही भूमी घडवली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादा नेहमी कोकणाची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीला बळ मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अधिक प्रभावीपणे घडत असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टीसीएस फाउंडेशन यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभत आहे. वारसा जतनामध्ये खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढावा, या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने […]

अधिक वाचा..

जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेची महाराष्ट्राच्या पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी

भोपाळ: जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि २३ ब्रॉंझ अशी ७७ पदके झाली आहेत. हरियाना २२, २६, १४ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी […]

अधिक वाचा..