शिल्पकलेतील आधुनिक तंत्रज्ञान अन् व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन; १५० हून अधिक विद्यार्थी-शिल्पकारांचा सहभाग

पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आणि ‘स्टुडिओ व्हिजिट’चे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या १५० हून अधिक विद्यार्थी आणि शिल्पकारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात कांदिवली येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार आणि संघटित शिल्पकार संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय चंद्रजीत यादव यांना भावपूर्ण मानवंदना […]

अधिक वाचा..

काळाघोडा कला महोत्सवात ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ शिल्पाचे सादरीकरण

मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीने यंदाच्या काळाघोडा कला महोत्सवात “तिच्या जीवनाच्या चौकटी” हे संकल्पनात्मक शिल्प साकारले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारलेले हे शिल्प, सिनेमाच्या पडद्यामागे मेहनत करणाऱ्या महिलांच्या योगदानाला समर्पित आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी कलाकृतीला भेट देऊन तिच्या सौंदर्यावर आणि संदेशावर आनंद व्यक्त केला. श्रीमती म्हसे पाटील […]

अधिक वाचा..

‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड-

मुंबई: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना […]

अधिक वाचा..