बॅलेटपेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु

मारकडवाडी: भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे. […]

अधिक वाचा..

मतदानानंतरच्या वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा

एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला […]

अधिक वाचा..

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार […]

अधिक वाचा..

मतदान करण्यासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य; जाणून घ्या..

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले असून या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.. 1) आधार कार्ड, 2) मनरेगा अंतर्गत निर्गमित […]

अधिक वाचा..

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]

अधिक वाचा..