थंडीच्या दिवसांत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये त्वचा रूक्ष – कोरडी होणे, निस्तेज व निर्जीव दिसणं, त्वचा कोरडी पडून भेगा पडणं, तसेच त्वचा ड्राय होऊन पापुद्रे निघणं यासारख्या समस्या सतावतात. जसजशी वातावरणातील थंडी वाढू लागते तसे या लहान वाटणाऱ्या समस्या अधिकच त्रास देतात. या सगळ्या समस्यांमुळे त्वचेचे नुकसान होऊन त्वचा अधिकच खराब दिसू लागते. परंतु या थंडीच्या दिवसांत वेळीच योग्य पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो केल्यास त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत मिळू शकते. हिवाळ्यात त्वचेचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून होममेड विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅक तयार करु शकतो.
बाजारातही ऋतुनुसार कित्येक प्रकारचे फेस सीरम आणि मॉइश्चराइझर उपलब्ध असतात. पण यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतीलच असे नाही. त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा मिळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नक्की वापरुन पाहू शकतो. हिवाळ्यात सतत स्किनच्या होणाऱ्या अनेक समस्या आणि त्यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी चमकदार, फ्रेश करण्यासाठी आपण एका खास विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅकचा वापर करु शकता.
साहित्य
१) खोबरेल तेल – १ टेबलस्पून
२) एलोवेरा जेल – १ टेबलस्पून
३) गुलाब पाणी – २ टेबलस्पून
४) मध – १ टेबलस्पून
कृती
१) सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात एलोवेरा जेल, गुलाब पाणी आणि मध घालावे.
2) आता हे सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने मिसळून घ्यावे. चमच्याने हलवून त्याची एकजीव पेस्ट तयार करून घ्यावी.
(सोशल मीडियावरून साभार)
L