प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

महाराष्ट्र

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘खिडकी’ या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित अभिवाचनाचा विशेष प्रयोग गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘खिडकी’ या पुस्तकामध्ये प्रदीप कबरे यांच्या जीवनप्रवासातील विविध अनुभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. या अनुभवांपैकी काही निवडक प्रसंगांचे प्रभावी कथन अभिवाचनाच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जाणार आहे.

या अभिवाचनाचे आतापर्यंत ५५ यशस्वी प्रयोग झाले असून, प्रत्येक प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्तनिधीच्या सहयोगाने हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. या अनोख्या अभिवाचनाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत