nilobaraya-gatha-mandir kahandale

खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिरूर : श्री तीर्थक्षेत्र खंडाळे (रांजणगाव गणपती) येथे संत परंपरेचा गौरव वाढवणारा श्री संत श्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिर व संत पंचायतन मंदिर या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास समारंभाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे ज्ञान-भक्ती परंपरेचे प्रतीक ठरणाऱ्या या पवित्र उपक्रमाने खंडाळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था व नंदकिशोर […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख […]

अधिक वाचा..

सुक्या मेव्यामधील ‘हा’ एक पदार्थ आहे हाडांवर रामबाण उपाय

सुकामेवा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. असं असलं तरी काही पदार्थ तुमची हाडे आतून मजबूत करू शकतात हेही खरं आहे. असाच एक पदार्थ म्हणजे काळे मनुके. हे दिसतात तर एवढेसे पण यांचे फायदे आभाळाएवढे आहेत. काळे मनुके एक गोड आणि पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूड आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे मजबूत […]

अधिक वाचा..

शारीरिक कमकुवतपणा नाही तर दृष्टीवरसुद्धा परिणाम करेल ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला […]

अधिक वाचा..

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

अधिक वाचा..

मेथीच्या बियांमुळे खरंच वजन कमी होतं का?

भारतात प्रत्येत घरात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या बियांना पारंपरिक औषध म्हणून ओळख मिळाली आहे. पण, या छोट्याशा बियांचं खरं रहस्य काय आहे. त्या वजन कमी करण्यात मदत करतात का, हार्मोन्स संतुलित ठेवतात का की उलट पचनावर परिणाम करतात. मेथीच्या बिया खायच्या की टाळायच्या मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यांचं योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं सेवन […]

अधिक वाचा..

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आहार कसा असावा? काय खावे, काय नाही खाल्ले तर तब्येतीवर होतात परिणाम 

थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा […]

अधिक वाचा..

पुणे जमीन प्रकरणी जमीन विकणाऱ्यावर कारवाई होते मग जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई का होत नाही

अधिवेशनात नामुष्की होईल म्हणून सरकार कारवाई करण्याचा दिखावा करत आहे नागपूर: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक होते पण जमीन विकत घेणाऱ्या अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारवर कारवाई का होत नाही? यातून मुख्यमंत्र्यांचा बारामती करांच्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे हे स्पष्ट होते अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपुरात माध्यमांशी […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवून विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुंबई: डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीस पीडितेचे आई-वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या […]

अधिक वाचा..