सविंदणे येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री गुरुदेव दत्त विद्यालय येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्ट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे प्रमुख प्रणेते ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र ढगे,आपटी असून, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांच्या […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनवा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता? पुणे: भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष […]

अधिक वाचा..

व्यायामा दरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

डोळ्यात काजळ घालावे की नाही 

घरात बाळ असले म्हणजे आईची सारखी धावपळ चाललेली असते. बाळाची आंघोळ, त्यांना नटवणे इत्यादी. बऱ्याच महिला बाळाच्या डोळ्यात काजळ घालतात. घरातील वयोवृद्ध स्त्रिया बाळाला काजळ लावण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या मते काजळ घातल्याने बाळाचे डोळे मोठे होतात, पाणीदार होतात व दृष्टी सुधारते. बरेच डॉक्टर मात्र डोळ्यात काजळ घालू नका असे कटाक्षाने सांगतात. काजळ डोळ्यात घालताना काजळातील […]

अधिक वाचा..

UPSC ची शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याने संपवल आयुष्य

लातूर: यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, रामदार श्रीरामे, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमरावतीला ट्रेनिंग जातो, असं सांगून ते घरातून निघाले होते. त्यांनी […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

जामखेड: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, […]

अधिक वाचा..

सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र, जास्तीत लोकापर्यंत पक्षाचे संदेश पाठवण्यासाठी वापर करा; सुप्रिया श्रिनेत

मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम सुरु पुणे: सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या महागणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) अष्टविनायकापैकी महागणपती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती येथे आज (दि १२) रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्री महागणपतींचा महाभिषेक करुन मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चिमुकलीवर वर्ग मित्राकडून, तर महिलेवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना दारव्हा तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने अत्याचार केला, तर दारव्हा तालुक्यात महिलेवर पाच जणांनी निर्जनस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार केला. दारव्हा ते बागवाडी मार्गावर एका ३४ वर्षीय महिलेशी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा..