जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून मोठा नफा होऊ शकतो. तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या कनिष्ठांकडून सहकार्य मिळू शकेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात नफा झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. वृषभ: राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा. वादाला प्रोत्साहन देऊ […]

अधिक वाचा..

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ठाणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. अतिरेक्यांच्या या पूर्वनियोजित आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मात्र जनतेत दहशतवादाविरुद्ध तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील […]

अधिक वाचा..

मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय गणेश रामदास शितकल या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला असून शिरूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्घटना २२ एप्रिल रोजी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश शितकल (रा. कवठे येमाई) हा त्याच्या ताब्यातील बजाज […]

अधिक वाचा..

अण्णापूरमध्ये बेकायदेशीर घातक कचरा जाळल्याचा प्रकार

पर्यावरणाची मोठी हानी, नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासन मूग गिळून गप्प शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावात (दि. २२) एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा बेकायदेशीररित्या जाळण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीच्या बांधकामस्थळी अपघात; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच

भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते […]

अधिक वाचा..

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक […]

अधिक वाचा..

जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रमाला रद्द

दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून या प्रत्यार्थ परिवहन […]

अधिक वाचा..

जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अजित पवारांनी घेतला पुढाकार

प्रत्येक नागरीकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता;पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था – अजित पवार मुंबई: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त प्रवास या जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ठाणे: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ” प्रवास ” या कृतज्ञता दर्शक चरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक व युवासेना […]

अधिक वाचा..