शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.या आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले […]

अधिक वाचा..

पुणे अहिल्यानगर महामार्गावर चाकूचा धाक दाखवून चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. या आरोपींकडून तब्बल २४ मोबाईल फोन, रोख रक्कम, चाकू आणि मोटारसायकलसह एकूण ३ लाख ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी […]

अधिक वाचा..

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा – केडगाव चौफुला रोडवरील आंधळगाव येथील सीएनजी पंपाजवळ सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाला गंभीर अवस्थेत ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हवालदार व्ही.एस. […]

अधिक वाचा..

गंगापेट्रोल पंपाजवळ तिघांकडून व्यापाऱ्यावर हल्ला, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गंगापेट्रोल पंप परिसरात किरकोळ कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी व्यापाऱ्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेत व्यापाऱ्याला डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सिताराम चिपाडे (वय ४०, व्यवसाय – व्यापारी, रा. बोराडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी […]

अधिक वाचा..

शिरूरचा बेट भागात चोरट्यांचा धुमाकुळ, तब्बल चार ठिकाणी लुटमारीच्या घटना

कवठे येमाई, सविंदणे, टाकळी हाजी परिसरात सलग चार घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत माजवली आहे. केवळ दोन दिवसांत (दि. ४ व ५ ऑक्टोबर) चार वेगवेगळ्या चोरी व लुटीच्या घटना घडल्याने बेट भागात भीतीचे सावट पसरले आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी […]

अधिक वाचा..
omkar-walke-karegaon

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड…

कारेगाव (तेजस फडके) : “किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून!” अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. एका किरकोळ धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद एवढा चिघळला की, अखेर निष्पाप युवाकाच जीव गेला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) याबाबत रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..
gayatri-ingle-shikrapur

शिरूर ! पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले आहे. मंगळवारी (ता. १) साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गायत्री गजानन इंगळे (रा. शिक्रापूर, वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. युवती आपल्या अॅक्टीव्हा (एम.एच. […]

अधिक वाचा..

शिरूर! इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून युवकावर जीवघेणा हल्ला; पाहा Video

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून तब्बल १६ लाख ३३ हजार रुपयांचा कॉपर ट्यूबचा साठा चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या चोरीमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत नामदेव महादु गाडेकर (वय ३७, रा. मराठानगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी […]

अधिक वाचा..